दसरा मेळाव्याची परवानगी मिळताच राज्यभरात शिवसैनिकांचा जल्लोष, उद्धव ठाकरे म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai HighCourt) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) ठाकरे गटाला दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्याची परवानगी दिली आहे. मात्र कायदा सुव्यवस्था राखण्याची हमी देण्याचे निर्देश ठाकरे गटाला देण्यात आले आहेत...

हा निकाल सुनावताना कोर्टाने शिंदे गटाला (Shinde Group) झटका दिला. सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी केलेली मध्यस्थी याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. ठाकरे गटाला शिवतीर्थावर (Shivtirtha) परवानगी मिळताच शिवसैनिकांनी (Shivsainik) राज्यभरात जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत शिवसैनिकांनी आनंद साजरा केला.

यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपली उमेदवारी भगवा झेंडा आहे, आता प्रत्येक महानगरपालिका जिंकायची असून कार्यकर्त्यांनो तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, नाशिकमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. तसेच निवडणुकीच्या तोंडावर रुसवे, फुगवे, गट पडू देऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com