भाजपच्या संसदीय समितीची घोषणा; नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांना वगळले

भाजपच्या संसदीय समितीची घोषणा; नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांना वगळले

मुंबई | Mumbai

भारतीय जनता पक्षाने आपल्या नव्या संसदीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या संसदीय समितीत एकूण ११ नेत्यांची नावे आहेत.

मात्र, यामध्ये महाराष्ट्र भाजपच्या नेत्याचा समावेश नाहीये. यापूर्वी नितीन गडकरी या समितीवर होते. मात्र, आता जाहीर करण्यात आलेल्या संसदीय समितीच्या यादीत गडकरींच्या नावाचा समावेश नाहीये. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना देखील संसदीय मंडळातून वगळण्यात आलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे या संसदीय मंडळाचे आणि भाजपच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील. सर्बानंद सोनोवाल आणि बी एस येडियुरप्पा यांचा भाजपच्या बोर्डात समावेश करण्यात आला आहे.

भाजपच्या संसदीय समितीची यादी

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)

पंतप्रधान नरेंद्र मोदी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

गृहमंत्री अमित शाह

बी. एस येडियुरप्पा

सर्बानंद सोनोवाल

के लक्ष्मण

इक्बाल सिंग लालपुरा

सुधा यादव

सत्यनारायण जातिया

बी एल संतोष (सचिव)

संसदीय मंडळ ही भाजपची सर्वात शक्तिशाली संस्था मानली जाते. पक्षाचे सर्व मोठे निर्णय या मंडळाच्या माध्यमातून घेतले जातात.

याशिवाय भाजपने निवडणूक प्रचार समितीचीही घोषणा केली आहे. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि ओम माथूर यांना स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यात स्थान देण्यात आलं नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com