Saturday, April 27, 2024
Homeराजकीयशिवसेनेचे संपर्क मंत्री जाहीर...

शिवसेनेचे संपर्क मंत्री जाहीर…

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची सोलापूर व सांगली तर कृषी मंत्री दादाजी भुसे यांचेकडे शिवसेनेचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्ह्यांसाठी शिवसेना पक्षाकडून संपर्क मंत्री जाहीर केले आहे. यात नगर व नाशिक जिल्ह्याची जबाबदारी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या वर सोपविण्यात आली आहे.तर मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे सोलापूर व सांगली जिल्ह्यातील जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्कमंत्री जाहीर केले.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे (मुंबई शहर), उद्योगमंत्री सुभाष देसाई (जालना),एकनाथ शिंदे (चंद्रपूर व गोंदिया) ,उदय सामंत (कोल्हापूर व सातारा) , दादा भुसे ( नाशिक व नगर ) , गुलाबराव पाटील ( बुलढाणा व अमरावती ), अड .अनिल परब ( पुणे व रायगड) , शंकरराव गडाख ( सोलापूर व सांगली) , संजय राठोड ( नांदेड,भंडारा व नागपूर) , अब्दुल सत्तार (नंदूरबार व वर्धा) , शंभुराज देसाई ( हिंगोली व परभणी) , संदीपान भुमरे (बीड व लातूर )

- Advertisment -

ताज्या बातम्या