Friday, April 26, 2024
Homeराजकीयरावसाहेब दानवे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी - शिवसेनेतर्फे आंदोलन

रावसाहेब दानवे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी – शिवसेनेतर्फे आंदोलन

शहादा – Shahada – ता.प्र :

केंद्र शासनाने केलेला नवीन कृषी विधेयक कायदा रद्द करावा यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना खलिस्तानवादी अतिरेकी म्हणून संबोधणारे त्याचप्रमाणे या आंदोलनाला चीन व पाकिस्तान पैसा पुरवत असल्याचा दावा करणार्‍या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी तसेच पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात निषेध आंदोलन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

- Advertisement -

येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आज शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल व डिझेलच्या किमती अत्यंत कमी असताना केंद्रशासन यात दररोज वाढ करून जनतेची पिळवणूक करीत आहे.

केंद्र शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यात येऊन केंद्र शासनाने त्वरित डिझेल व पेट्रोलच्या किमती कमी कराव्यात. केंद्र शासनाने नुकतेच तीन कृषी कायद्यांना मंजुरी दिली. सदर कायदे शेतकरीविरोधी असल्याने यात शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून धनिकांचा व व्यापार्‍याचा फायदा होणार आहे.

सदर कायदे रद्द करावे यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून देशातील कोट्यावधी शेतकरी सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहेत शेतकर्‍यांची मागणी ही न्याय असून केंद्र शासनाने त्वरित हे तिन्ही कायदे रद्द करावे शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला केंद्र शासनातील मंत्री रावसाहेब दानवे यांनी खलिस्तानवादी अतिरेक्यांचे आंदोलन म्हणून संबोधित केले आहे.

त्याचप्रमाणे या आंदोलनाला चीन व पाकिस्तान पैसा पुरवीत असल्याचा खोटा दावा केला आहे केंद्रीय मंत्र्यांचे हे विधान शेतकर्‍यांचा आंदोलनाचा अपमान करणारे असल्याने केंद्र शासनाने मंत्री दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करीत केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सखाराम मोते उपजिल्हा संघटक मधुकर मिस्त्री, तालुका संघटक भगवान अलकारी, शहर संघटक गणेश चित्रकथे, उत्तम पाटील, सागर पाटील, बापू सूर्यवंशी, माजी नगरसेवक विनोद चौधरी, बापू चौधरी, दिलीप पाटील, सुरेश मोरे, गुलाब सुतार, प्रवीण सैंदाणे, बिपिन सोनार, इद्रिस मेमन, चुडामन पाटील, प्रदीप निकुंबे, विनोद पाटील, राहुल चौधरी, नाना बिरारे, प्रशांत नायक, प्रकाश शिरसाठ, वसीम अन्सारी, अशोक ईशी, ऋषिकेश शिवदे, अक्षय वाडीले, निलेश पाटील, तौसिफ खान, अशपाक काझी, राजेश भावसार, सुदाम लोहार, सतीश पाटील, लहू बागले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आंदोलनात सहभागी होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या