धुळे - Dhule - प्रतिनिधी :

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांचे दर वाढल्यामुळे शहरात शिवसेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यासाठी प्रतिकात्मक केंद्र सरकारची प्रेतयात्रा काढण्यात आली.

शहरातील विविध मार्गावरुन प्रेतयात्रा काढण्यात येवून महापालिकेसमोर आंदोलनाचा समारोप होवून प्रेतयात्रा जाळण्यात आली. तेथे घोषणाबाजी केल्यामुळे परिसर दणाणून गेला.

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे केंद्र सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.

शहरातील आग्रारोडवरील शिव पुतळ्यापासून प्रेतयात्रेला सुरुवात झाली. आग्रारोड मार्गाने पाचकंदील चौक, कराचीवाला खुंट तेथून जुना महापालिका मार्गाने नवीन महापालिकासमोर प्रेतयात्रा काढण्यात आली.

केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रेतयात्रेत दुचाकी लोटत नेवून पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रेतयात्रेच्या पुढे आग्याही होता.

या आंदोलनात संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, डॉ. सुशिल महाजन, महेश मिस्तरी, चंद्रकांत म्हस्के, धनराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महापालिकेतर्फे केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले व केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.