Friday, April 26, 2024
Homeराजकीयशिवाजीनगरात सार्वजनिक शौचालयांच्या स्थलांतरासाठी शिवसेनेचा विरोध

शिवाजीनगरात सार्वजनिक शौचालयांच्या स्थलांतरासाठी शिवसेनेचा विरोध

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

राजकीय पदाधिकार्‍यांच्या इमारती वाचविण्यासाठी शिवाजीनगरातील शौचालयांचे स्थालांतरण केले जात असल्याचा आरोप केला. तसेच शेकडो नागरिकांनी याठिकाणी सुरु असलेल्या शौचालयांचे बांधकाम बंद पाडले. त्यानंतर शिवसेनेच्या मोर्चा मनपात येत त्यांनी आयुक्तांना घेराव घालीत शौचालयांचे बांधकाम सुरु झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

शिवाजी नगर परिसरातील डीपी रोडवर असल्याचे कारण देत जूने सार्वजनिक शौचालये तोडण्यात आले आहे. तसेच हे शौचालयांचे स्थलांतरण करुन नवीन शौचालय हे शिवाजीनगर हुडकोच्या मागील बाजूस त्यांचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. हे बांधकाम सुरु असतांना शिवाजीनगर परिसरातील शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय बांदल यांच्यासह नागरिकांनी याठिकाणी येत सुरु असलेले बांधकाम बंद पाडीत शौचालयाच्या कामाला विरोध केला.

डीपीरोड मोकळा करण्याच्या सूचना

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह नागरिकांनी मनपात आयुक्तांना घेराव घालीत ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी मनपाचे बांधकाम विभागाचे अभियंता सोनगीरे, नगरविभागाच्या अधिकार्‍यांसह नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शौचालयांचे सुरु असलेल्या बांधकामाठिकाणी पाहणी केली. दरम्यान हा रस्ता डीपी रोड म्हणून घोषीत असूनही याठिकाणी राजकीय पदाधिकार्‍यांडून घरे बांधण्यात आली आहे. त्यामुळे हा डीपी रोड मोकळा करण्याच्या सूचना नगरसेवक कैलास सोनवणे यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

आंदोलनाचा इशारा

स्थालांतरीत ठिकाणी सुरु असलेल्या शौचालयांचे बांधकाम नागरिकांनी बंद पाडले. दरम्यान जूने शौचालयाजवळून गेलेला डीपी रोड देखील मोकळा करण्याच्या सूचना नगरसेवक कैलास सोनवणे यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहे. त्यामुळे शौचालयांचे बांधकाम पून्हा सुरु झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे विभागप्रमुख विजय बांदल, महिला महानगराध्यक्ष ज्योती शिवदे यांच्यासह आंदोलक नागरिकांनी दिला आहे.

स्थलांतरणासाठी राजकीय पुढार्‍यांचा दबाव

शिवाजीनगरात पूर्वी असलेल्या शौचालयाच्या जागेवर डीपी रोड मंजूर झाला आहे. याठिकाणी राजकीय पदाधिकार्‍यांची घरे आहेत. या घरांसमोर ही शौचालये येत आहे. त्यामुळे राजकीय पदाधिकार्‍यांनी दबाव निर्माण करीत हे शौचालयांचे स्थालांतरण करीत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या