Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याएकनाथ शिंदे होणार नवे पक्षप्रमुख? आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक

एकनाथ शिंदे होणार नवे पक्षप्रमुख? आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक

मुंबई | Mumbai

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल झाल्यानंतर आता मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना आज पहिली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक ताज रेसिडन्स येथे पार पडणार आहे.

- Advertisement -

या बैठकीला राज्य कार्यकरिणीतील नेते, आमदार, खासदार आणि इतर प्रमुख नेतेही उपस्थित असणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांची नवे पक्षप्रमुख म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे.

VIDEO : भर कार्यक्रमात सोनू निगमला धक्काबुक्की; अंगरक्षक जखमी

तसेच नव्या शिवसेनेचे राष्ट्रीय नेते, उपनेते यांचीही निवड करण्यात येणार आहे. यामुळे आता नेतेपदी कोणाची निवड होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे पक्षाची पुढची वटचाल, अर्थसंकल्पीय अधिवेशन व निवडणुका यावरही चर्चा होईल.

आगामी काळात पक्षवाढीच्या दृष्टीने आमदार आणि खासदार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहे. त्यामध्ये ठाकरे गटाला पुढील काळात सामोरे जातांना काय काळजी घ्यायची यावर देखील बोलण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंना दिलासा! ‘त्या’ याचिकेवर सुप्रीम कोर्ट घेणार उद्या सुनावणी

सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी धाव घेतलेली असतांना दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे पक्षाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित करत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या बाबतीत ठाकरे गटाने याचिका दाखल केल्याने त्यामध्ये काय युक्तिवाद होती, पक्ष आणि चिन्ह यावर स्थगिती मिळते का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या दोन्ही घडामोडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

संतापजनक! ६५ वर्षाच्या वृद्धाचा दोन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

- Advertisment -

ताज्या बातम्या