आठ दिवसांत काँक्रिटीकरण; कामाआधीच बिल,मनपाचे विश्व रेकॉर्ड

शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांचा आरोप; सत्ताधारी, अधिकारी अन् ठेकेदार मिळून लुटताहेत तिजोरी
आठ दिवसांत काँक्रिटीकरण; कामाआधीच बिल,मनपाचे विश्व रेकॉर्ड

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील ज्योती सिनेमा गृहालगतच्या बोळीतील रस्त्याचा कार्यादेश 10 फेब्रुवारीला निघतो आणि 18 फेब्रुवारीला या रस्त्याचे बिलही अदा होते.

अवघ्या आठ दिवसात काँक्रीटीकरणारे हे वेगवान तंत्रज्ञान केंद्रसरकारने अवगत करायला हवे, असा उपहासात्मक टोला लावतांनाच अद्याप या रस्त्याचे 40 टक्के काम बाकी असल्याची माहिती शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी दिली. भाजपाचे सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने मनपाची तिजोरी लूटत असल्याचा आरोही त्यांनी केला.

याच रस्त्यावर घेतलेल्या पत्र परिषदेला श्री.मोरे यांच्यासह सेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील यांच्यासह संदीप चव्हाण, गुलाब माळी, जवाहर पाटील, राजू पाटील, शेखर बडगुजर, पंकज भारस्कर, भटू गवळी, रामदास कानकाटे, देवा लोनारी, राजेश पटवारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

श्री.मोरे म्हणाले, मनपाची बहुतांशी कामे मर्जीतल्या ठेकेदाराला दिली जातात. कारण मनपातील सत्ताधार्‍यांची या ठेकेदारांशी आर्थिक भागिदारी आहे. निविदा मॅनेज करुन आणि नित्कृष्ठ कामे करुन मनपाच्या तिजोरीवर संगनमताने घाला घातला जातो आहे.

महात्मा गांधी चौक ते ज्योती चित्रमंदिराच्या कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याची वर्कऑर्डर 10 फेब्रुवारी 2020 रोजी निघाली. 18 फेब्रुवारीला हा रस्ता पूर्ण झाल्याचे दाखवून रनिंग बिलच्या नावाखाली बिल काढण्यात आले.

नियमाप्रमाणे कोणतेही काम होत नसतांना बिले काढण्याची घाई का केली जाते. या रस्त्याची एम.बी. आम्ही माहिती अधिकारात मागितली. मिळाली नाही. संबंधित अधिकारी देत नाही मग मनपातून अशा नोंदी, नोंदवह्या चोरीला जातात कशा? भ्रष्टाचार लपवण्यासाठी मनपाचा विभाग पुन्हा जाळण्याचा प्रकार घडू शकतो, अशी शक्यता श्री.मोरे यांनी व्यक्त केली असून याबाबत नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार अस्याचे सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com