धुळे – Dhule – प्रतिनिधी :
शिवसेना नेते खा.संजय राऊत यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा जाहीर झाला असून ते आज दि.10 रोजी धुळे जिल्हा दौर्यावर येत आहे.
त्यांच्या सोबत कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री अब्दुल सत्तार, धुळे- नंदुरबार संपर्क प्रमुख बबनराव थोरात, नाशिक संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, आ. सौ.मंजुळा गावित, जळगाव संपर्क प्रमुख संजय सावंत हे उपस्थित राहणार आहेत. खा. राऊत यांचे सुरत बायपासवरील हॉटेल चंद्रदीप येथे दुपारी 2 वाजता आगमन होणार आहे.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीस खा.संजय राऊत मार्गदर्शन करतील. तसेच तीन वाजेनंतर हॉटेल चंद्रदीप येथे प्रमुख पदाधिकार्यांशी चर्चा करून त्यानंतर नंदुरबार कडे प्रयाण करतील, अशी माहिती जिल्हाप्रमुख हिलाल माळी व हेमंत साळुंखे यांनी कळविले आहे. बैठकीला फक्त लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनीच उपस्थित रहावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.