पालकमंत्र्यांनी शिवसैनीकांशी संघर्ष करण्यापेक्षा समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करावा

jalgaon-digital
3 Min Read

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

नंदुरबारच्या पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी हे जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्याना सहकार्य करत नाहीत अशा कार्यकत्यांच्या तक्रारी आहेत.

त्यांनी जिल्ह्यातील शिवसैनीकांशी संघर्ष करण्यापेक्षा जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करावा त्यांना आम्हीही साथ देवु अशी चिमटा शिवसेनेचे नेते राज्यसभा खा.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत काढला.

शिवसेनेचे नेते तथा खा.संजय राऊत नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आले आहेत.त्याप्रसंगी नंदुरबार येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी ते बोलत होते.पुढे श्री.राऊत यांनी सांगीतले कि, राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते केंद्राच्या प्रतिक्षेत असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

राज्यात आघाडी सरकार हे पूर्ण पाच वर्ष चालणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे देशातले सर्वात्तम मुख्यमंत्री आहेत. हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. याबाबत कोणीही काही सांगायची गरज नाही. महाविकास आघाडीतील नंदुरबारचे पालकमंत्री अ‍ॅड. के.सी.पाडवी हे शिवसैनिकांना सहकार्य करीत नाही. अशा अनेक तक्रारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीत केल्या आहेत.

कोणीही मंत्री असले तरीही अशा पध्दतीने वागणे योग्य नाही. अ‍ॅड.के.सी.पाडवी आमचे सहकारी आहेत. त्यांनी 80 हजार मते मिळविलेल्या आमश्या पाडवींसह शिवसैनिकांसोबत संघर्ष टाळावा. पालकमंत्री यांनी शिवसैनिकांशी संघर्ष करण्यापेक्षा जिल्ह्यातील नागरीकांच्या समस्यांसाठी संघर्ष केला पाहिजे. शिवसेनेची संघर्ष थांबवून जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री यांनी शासनाशी संघर्ष करावे. नंदुरबार जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत जिल्ह्याचा विकास म्हणजेच राज्याचा विकास पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करावा. असेही यावेळी खा.राऊत यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आगामी काळात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर येथील नगरपालिकांच्या निवडणुका आहेत.

प्रत्येक जिल्ह्याची व तालुक्याची परिस्थिती वगळी असते त्यामुळे या निवडणुकीत आघाडीबाबत निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येणार आहे. तसेच नंदुरबार जिल्हा शिवसेनेसाठी अनुकूल आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांचा निसटता पराभव झाला होता.

हे सर्वलोक पुढच्यावेळी कशा आमदार होती. यासाठी आमचे काम चालू आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवींना आम्ही विधानसभेवर पाठविणार आहोत. याबाबत अ‍ॅड.के.सी.पाडवींना चांगलच समजले असेल. असे खा.राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेना नेते खा.संजय राऊत हे दि.9 ते 13 जूनपर्यंत उत्तर महाराष्ट्राचा संघटनात्मक दौर्‍यावर आज शुक्रवारी नंदुरबार येथील हिरा एक्झीक्युटीव येथे त्यांनी शिवसेनेच्या येथे त्यांनी शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारी व पक्षाच्या लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी सहकारमंत्री दादाजी भुसे, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आ.मंजुळा गावीत, जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, माजी जिल्हाप्रमुख दिपक गवते आदी उपस्थित होते.

नंदुरबार येथे शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत सांगितले की, शिवसेना जर पिंजर्‍यातला वाघ म्हणत असाल तर पिंजर्‍यात येण्याचे आम्ही आमंत्रण देतो. पिंजर्‍यात येवून वाघाच्या मिशीला हात लावून धाखवावा असेही त्यांनी सांगितले. त्यासोबत चंद्रकांत पाटीलांना एवढे गांभीर्याने घेवू नये, असेही त्यांनी सांगितले. त्यासोबत काँग्रेस हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यांनीही शिवसेने प्रमाणे संघटना बांधणी करणे आवश्यक आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *