“राजकीय आकसापोटी आमच्या कुटुंबीयांची...”; एकनाथ शिंदेंचा नवा आरोप

“राजकीय आकसापोटी आमच्या कुटुंबीयांची...”; एकनाथ शिंदेंचा नवा आरोप

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोरी (Rebel Eknath Shinde) केली आहे. ठाकरे सरकार धोक्यात (Thackeray government) आले असून, शिंदे गटाला शिवसेनेने मोठा धक्का दिला.

एकीकडे, महाविकास आघाडीने कायदेशीर लढाईला मार्ग स्विकराला आहे तर आता एकनाथ शिंदे यांनीही अधिक आक्रमक होत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतून एक नवे ट्विट केले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे सरकारने आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप केला आहे.

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे आता शाब्दिक वाद रंगण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com