यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर नाही तर 'या' ठिकाणी होणार

यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर नाही तर 'या' ठिकाणी होणार
File Photo

मुंबई l Mumbai

करोनाच्या (COVID19) प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Dussehra Melava) शिवतीर्थावर न होता शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता.

यावेळी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना ऑनलाईन मार्गदर्शन केले होते. आता यंदाचा दसरा मेळावाही (Shiv Sena Dussehra Melava 2021) ऑनलाईनच होणार की प्रत्यक्ष मेळावा होणार यावर चर्चा सुरू असताना आता शिवसेनेच्या बहूचर्चित दसरा मेळाव्याचं (Dasara Melava) ठिकाण अखेर ठरलं आहे.

यंदाच्या वर्षी मात्र ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन पद्धतीने हा दसरा मेळावा होणार आहे. जागा मात्र शिवतीर्थ नव्हे तर वेगळीच असेल. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. अशी माहिती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

या मेळाव्याला शिवसेनेचे मंत्री, वरिष्ठ नेते, उपनेते, आमदार, महापौर, काही नगरसेवक या सोहळ्याला हजर राहणार असतील. गेल्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा सावरकर सभागृहात संपन्न झाला होता.

Related Stories

No stories found.