धुळ्यात सेनेच्या 25 शाखांचे होणार उद्घाटन

धुळ्यात सेनेच्या 25 शाखांचे होणार उद्घाटन

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म दिवसानिमित्त धुळ्यात 25 शाखांचे उद्घाटन व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार, संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासुन सकाळच्या सत्रात मोटार सायकल रॅलीने शिवाजी महाराज पुतळा, अग्रसेन पुतळा, हजार खोली, जामचा मळा, मोहाडी, अवधान, हॉटेल आर्चिड, दसेरा मैदान, भाईजी नगर, चितोडनाका, बस स्टँड, संतोषी मातामंदिर, नेहरु पुतळा, साईबाबा मंगल कार्यालय, साई बाबानगर या ठिकाणी शिवसेना शाखा उदघाटन तसेच 12 वाजता प्रबोधनकार ठाकरे संकुल शिवसेना जिल्हा कार्यालय येथे विधवा आणि धुनी भांडे करणार्‍या 500 महिलांना साडी वाटप कार्यक्रम होणार आहे.

दुपारच्या सत्रात 3 वाजेपासुन नगावबारी, भोई सोसायटी, दत्त मंदिर चौक, विटा भट्टी, एकविरा देवी, पाटबाजा, ग. नं. 6, सुभाष चौक, पारोळा रोड अशा 25 ठिकाणी शिवसेना शाखांचे उदघाटन होणार असून सायंकाळी 7 वाजता शाहू महाराज नाट्य मंदिर येथे महानगर शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी दिली आहे.

कार्यक्रमाला आ. मंजुळा गावीत, संपर्क प्रमुख अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान करनकाळ, माजी जिल्हा प्रमुख भुपेंद्र लहमगे, राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी, उपजिल्हा प्रमुख अधार हाके, भुपेश शहा, युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी पंकज गोरे, माजी महानगर प्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, माजी विरोधी पक्ष नेता गंगाधर माळी, रविंद्र काकड, धीरज पाटील, महिला आघाडी संघटक कविता क्षीरसागर, अरुणा मोरे, माजी नगरसेवक चुडामण मोरे, नंदलाल फूलपगारे, विशाल देस्ले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्यासह उपजिल्हा प्रमुख किरण जोंधले, महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील, गुलाब माळी, राजेश पटवारी, संदीप सुर्यवंशी, संदीप चव्हाण, नंदलाल फुलपगारे, देवा लोनारी, विकास शिंगाडे, ललित माळी, रामदास कानकाटे, अरुण लष्कर, आबा भडागे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com