Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याराणा दाम्पत्याविरोधात शिवसेना आक्रमक; घरावर धडक मोर्चा

राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना आक्रमक; घरावर धडक मोर्चा

अमरावती | Amravati

राज्यात मशिदीवरील भोंगे (Loud Speaker) काढण्यावरून आणि हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणावरून गेल्या काही दिवसांपासून चांगलेच राजकारण तापले आहे. याच मुद्द्यावरून आता अमरावतीत (Amravati) शिवसेनेने (Shivsena) आक्रमक भूमिका घेतली आहे….

- Advertisement -

आज शिवसेनेने अमरावतीत रवी राणा (Ravi Rana) यांच्या घरावर मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राणा यांच्या घराकडे जाणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी (Police) रोखले.

त्यामुळे शिवसैनिकांनी ठिय्या मांडंत आंदोलन (Agitation) सुरु केले आहे. मातोश्रीवर (Matoshri) जाण्याअगोदर आमच्यासमोर हनुमान चालिसा म्हणून दाखवा, असे आव्हान शिवसैनिकांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांना दिले आहे. दरम्यान यावेळी पोलिसांनी (Police) आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या