शिंदे-फडणवीस सरकारविरोधात शिवसेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात शिवसेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतीच राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली...

तसेच शिंदे सरकारने (Shinde Government) विश्वासदर्शक ठरावदेखील जिंकला. या सत्ता स्थापनेबाबत आता शिवसेनेने (Shivsena) आक्षेप घेत पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे.

याआधी शिवसेनेकडून (Shivsena) बंडखोरी केलेल्या 16 आमदारांविरोधात कारवाई करण्यात आली. त्यांना अपात्र ठरविण्यात आले. याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने 11 जुलैपर्यंत जैसे थी स्थिती ठेवण्यास सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात शिवसेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
Visual Story : 'धर्मवीर'च्या शिरपेचात मानाचा तुरा

त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपला (BJP) सरकार स्थापन करण्याची संधी दिली होती. शिंदे आणि फडणवीस यांनी त्यानंतर राजभवनात शपथ घेतली. आता शिंदे सरकार विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

राज्यातील सत्ता स्थापनेवर शिवसेनेने (Shivsena) आक्षेप नोंदवला आहे. शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात दि. 3 व 4 जुलैला विधिमंडळ सभागृह बेकायदा पद्धतीने चालवले, विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती बेकायदा आहे, राज्यपालांची भूमिकादेखील बेकायदा आहे, असा आक्षेप घेण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण वाचविण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. शिवसेनेने जिल्हाध्यक्षांच्या समर्थनाचे प्रतिज्ञापत्र घेण्याचे काम सुरु केले आहे. या संदर्भात प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com