Sunday, April 28, 2024
Homeराजकीय'त्या' व्हायरल व्हिडीओवरून भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरून भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई l Mumbai

गाडीच्या खिडकीतून बंदूक बाहेर काढून धाक दाखवत ओव्हरटेक केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर घडला आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

- Advertisement -

एमआयएम खासादार इम्तियाज जलील यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. इम्तियाज जलील यांनी या प्रकरणामध्ये कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी हाच व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर टीका केली आहे.

निलेश राणे यांनी व्हायरल झालेला व्हिडीओ आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करत म्हंटले आहे की, “चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?,” असं ट्विट निलेश यांनी केलं आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये रात्रीच्यावेळी वाहतुककोंडीमध्ये एक कारचालक बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गाडीच्या मागील बाजूस शिवसेनेची ओळख असणाऱ्या महाराष्ट्राच्या भगव्या रंगाच्या नकाशावरील वाघ असं चिन्ह दिसत आहे. व्हिडीओमध्ये ट्रकच्या गर्दीमधून वाट काढण्यासाठी एक कारचालक ड्रायव्हिंग सीटवरुन उजव्या हातात पकडलेली रिव्हॉलव्हर गाडीच्या खिडकीबाहेर काढतो आणि ट्रकच्या रांगेमधून पलीकडच्या लेनमध्ये जाताना दिसतो. या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचा लोगो असल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येत आहे.

काय म्हंटलय इम्तियाज जलील यांनी?

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ‘महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील हे चित्र आहे. वाहनावरील लोगो सर्व काही सांगून जातो. शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी वाट काढत असताना रिव्हॉल्व्हरचं ब्रँडिंग करीत होता. राज्याचे गृहमंत्री व पोलीस महासंचालक याची दखल घेतील का,’ असा सवाल जलील यांनी केला आहे.

दरम्यान इम्तियाज जलील यांनी ट्विटरवर टाकलेल्या व्हिडीओवरुन राज्यात खळबळ उडाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली. हवेत फिरवलेली पिस्तूल ही गाडीत बसलेल्या व्हीआयपी व्यक्तीची असेल असे खैरे म्हणाले. तसेच, बंदूक कोणी कोणाला दाखवली नाही. ते सगळं चुकीचं आहे, असे खैरे म्हणाले. तसेच, जलील यांच्या घराच्या बाजूलाच गोळ्या झाडल्या जातात असेही खैरे म्हणाले. “दोन दिवसांपूर्वी जलील यांच्या घराच्या बाजूलाच बंदूक चालली. एका भंगारवाल्याने ही बंदूक चालवली. उद्वव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आमच्याकडे कोणीही दादागिरी करत नाही. बंडखोऱ्या, दगडफेक असले प्रकार आमच्याकडे होत नाहीत,” असे खैरै म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या