आ.सुहास कांदेंविरोधात पिंपळगाव टोलनाक्यावर शिवसैनिकांची घोषणाबाजी

आ.सुहास कांदेंविरोधात पिंपळगाव टोलनाक्यावर शिवसैनिकांची घोषणाबाजी

नाशिक । Nashik

शिवसंवाद यात्रेच्या (Shiv sanvad Yatra) निमित्ताने शिवसनेचे आमदार आणि राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहे. आज ते शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांचा मतदारसंघ असलेल्या मनमाडमध्ये (Manmad) शिवसैनिकांचा मेळावा घेणार आहे. परंतु या मेळाव्या अगोदर आ.कांदे यांच्या गाड्यांचा ताफा शिवसैनिकांनी पिंपळगाव टोलनाक्याजवळ (Pimpalgaon toll plaza) अडवत घोषणाबाजी केली...

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे येण्याच्या पंधरा मिनिट आधी शिंदे गटाचे (Shinde group) आमदार सुहास कांदे यांचा ताफा टोल नाक्यावरून जात असतांना शिवसैनिकांनी (ShivSainik) अडवला. यावेळी सुहास कांदे गाडी उभी करून खाली उतरले. त्यावेळी येथे जमलेल्या शिवसैनिकांनी कांदे यांना बघताच गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर कांदे गाडीत बसून मनमाडच्या दिशेने रवाना झाले .

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी काळाराम मंदिराचे (Kalaram temple) दर्शन घेऊन मनमाडच्या दिशेने मार्गक्रमण केले. तसेच आमदार सुहास कांदे हे आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याच्या ठिकाणी दहा हजार शिवसैनिकांसोबत त्यांची भेट घेणार असल्याने मनमाडमध्ये आदित्य ठाकरे आणि आ. कांदे आमने सामने येण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com