छाननीअंती शिरपूर तालुक्यात 8 गणांसाठी 22 अर्ज वैध

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

छाननीअंती शिरपूर तालुक्यात 8 गणांसाठी 22 अर्ज वैध ठरले असून माघारीनंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होईल. विखरण बु. गण बिनविरोध झाले आहे.

शिरपूर तालुक्यात 8 गणांसाठी काल 25 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी विखरण बु. गणातून विनिताबाई पाटील यांची बिनविरोध निवडून आल्याने आता फक्त 7 गणांमध्ये निवडणूक होईल.

छाननी अंती गण निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे

अर्थे खु. गणातून सर्वसाधारण स्त्री राखीव जागे साठी चव्हाण अश्विनी सुधीर (अर्थे बु.) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पाटील सुरेखा सुनिल (अर्थे बु.) अपक्ष, पाटील संगिता शशिकांत (अर्थे खु.) भारतीय जनता पार्टी.

विखरण बु. गणातून सर्वसाधारण जागेसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे विनिताबाई मोहन पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड.

तर्‍हाडी त. त. गणा साठी सर्वसाधारण स्त्री राखीव जागे साठी पाटील रत्नाबाई हनुमंतराव (जवखेडा) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भामरे कल्पना विलास (तर्‍हाडी त. त.) अपक्ष, भामरे प्रतिभा कैलास (तर्‍हाडी त. त.) भारतीय जनता पार्टी.

वनावल गणासाठी सर्वसाधारण जागेसाठी चित्ते चेतन हरी (भरवाडे) अपक्ष, चौधरी ममता ईश्वर (भरवाडे) भारतीय जनता पार्टी, धनगर कांतीलाल परशराम (वनावल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पाटील संदीप भटू (खामखेडा) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.

जातोडा गणासाठी सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी पाटील विठाबाई निंबा (बाळदे) भारतीय जनता पार्टी, पाटील सुवर्णा जयेश (खर्दे खु.) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.

शिंगावे गणासाठी सर्वसाधारण जागेसाठी पाटील चंद्रकांत दामोदर (शिंगावे) भारतीय जनता पार्टी, पाटील रमाकांत आनंदराव (शिंगावे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पाटील शिरीष मनोहर (शिंगावे) अपक्ष, महाजन रामकृष्ण विठोबा (उंटावद) अपक्ष.

करवंद गणासाठी सर्वसाधारण जागेसाठी पाटील जितेंद्र उत्तमराव (अजंदे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोनवणे यतिष सुनील (मांडळ) भारतीय जनता पार्टी, सोनवणे वैशाली सुनील (मांडळ) अपक्ष.

अजनाड गणासाठी सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी जाधव रेखाबाई दर्यावसिंग (बभळाज) भारतीय जनता पार्टी, ठेलारी सुमित्रा दीपक (बभळाज) शिवसेना.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com