नगराध्यक्ष निवडीत 2014 चा इतिहास घडणार - अनिता जगताप

नगराध्यक्ष निवडीत 2014 चा इतिहास घडणार - अनिता जगताप

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

2014 मध्ये शिर्डीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी जो इतिहास घडला होता तोच आता घडणार असून कमळाचा नगराध्यक्ष होणार नाहीत,

असे ठाम मत शिवसेनेच्या नगरसेविका अनिताताई जगताप यांनी व्यक्त केले. दरम्यान त्यांनी नगराध्यक्षपदासाठी काल आपला अर्ज मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्याकडे सुपूर्द केला.

शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यपदाची निवड दि. 7 रोजी विशेष सभा घेऊन करण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख तथा विद्यमान नगरसेविका अनिताताई जगताप यांनी काल दिनांक 1 डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.

यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सत्ताधारी गटातील नगरसेवक स्वाभिमानी असून बरोबर आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. 2014 मध्ये शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी जो इतिहास घडला होता त्याची आता पुनरावृत्ती होणार असून कमळाचा नगराध्यक्ष होणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान नगरसेविका अनिताताई जगताप यांनी शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची सूत्रे यापूर्वी हाताळली आहेत. जनतेला मी नगराध्यक्षा असताना शहरात केलेल्या कामाची माहिती आहे. त्यामुळे नगराध्यपदी संधी मिळाल्यास पुन्हा करोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरपंचायतमध्ये प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी कटीबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

2014 मध्ये नगराध्यपदाची माळ ज्याप्रमाणे अनिताताई जगताप यांच्या गळ्यात पडली होती, त्यावेळी मित्रपक्षांनी एकत्र येऊन साथ दिली होती, आता पुन्हा तेच मित्रपक्ष एकत्र येतात की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com