Thursday, April 25, 2024
Homeराजकीयनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आंदोलन राजकीय स्टंटबाजी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आंदोलन राजकीय स्टंटबाजी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपंचायतची निवडणूक वर्षभरावर आली असल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटांनी वाढीव पाणीपट्टीच्या मुद्याचे भांडवल करत आंदोलन केले

- Advertisement -

असून अशाप्रकारचे आंदोलन करून आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीतील सर्व मालमत्ताकर कमी करणे, गाळेभाडे कमी करणे यासाठी शिर्डी नगरपंचायतने केलेल्या ठरावास शासनाने मान्यता द्यावी यासाठी लढा द्यावा असे मत नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांनी व्यक्त केले आहे.

खरं तर शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी एक महिला नगराध्यक्षा म्हणून माझ्या बरोबरच चर्चा करणे गरजेचे होते मात्र तसे न करता राजकीय हेतुने माझ्या अनुपस्थितीत माझ्या दालनात प्रवेश करून खुर्चीला निवेदन चिटकवले.यापूर्वी शिवसेनेच्याच महिला जिल्हा आघाडी प्रमुख अनिता जगताप यांचे निवेदन स्विकारले होते.

त्यानुसार यांचे निवेदन स्विकारुन त्यावर विचारविनीमय केला असता मात्र केवळ राजकीय स्टंटबाजी करण्यासाठी हे आंदोलन केले गेले. शिर्डीतील नागरिक जागृत असून या आंदोलनामुळे शिर्डीकरांनी काय समजायचे ते समजून घेतले आहे. यापूर्वी ते सत्तेवर असताना घरपट्टीत वाढ केली होती.

याचा कदाचित त्यांना विसर पडला असावा.त्यावेळी घऱपट्टी वाढविल्याने आज नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या घरपट्टी वाढ संदर्भात आम्ही शिर्डीतील शिवालयावर महिलांना बरोबर घेऊन भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. ते सत्तेवर असताना शहरातील रस्त्यांची कामे अत्यंत नित्कृष्ट दर्जाची झाली. हे रस्ते अल्प कालावधीत खराब झाल्याने आम्ही पुन्हा ते नव्याने केले आहेत.

पाणीपट्टी वाढ संदर्भात नगरपंचायतने फेब्रुवारीमध्ये ठराव केला आहे.त्यावेळी करोना हा आजार आलेला नव्हता. सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. मात्र त्यानंतर हा आजार आला आहे. मुळातच शिर्डी नगरपंचायतची पाणीपुरवठा योजना वर्षाला साडेतीन कोटी रुपये तोटा सहन करत आहे. शेजारील शहरात आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात होता.

या शहरात भिषण पाणी टंचाई होती.असे असताना ऐन दुष्काळी परीस्थितीत शिर्डीकरांना पाणी टंचाई भासु न देता मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला. शिर्डीकरांना सर्व सुविधा मिळाव्या, शहरातील रस्ते, ड्रेनेज लाईन आदी मुलभूत सुविधा अतिशय चांगल्याप्रकारे देण्याचा प्रयत्न करत तो आम्ही यशस्वी केला.

हे आता देखवत नसल्याने चांगल्या कामाचे कौतुक करण्याऐवजी नको त्या मुद्यावर राजकीय स्टंटबाजी करून प्रसिध्दी मिळविली जात आहे. यामागे कोण आहे हे सर्वांना माहिती आहे.लॉकडाऊन काळातील घरपट्टी, गाळा भाडे, हॉटेल कर याबाबत शिर्डी नगरपंचायतने कर माफ करण्या संदर्भात आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत ग्रामस्थांची नगरपंचायतमध्ये बैठक झाली.

यावेळी ठरल्याप्रमाणे आ.विखे पाटील यांच्या आदेशान्वये मालमत्ता कर कमी करणे, गाळेभाडे कमी करणे याबाबत नगरपंचायतने ठराव केला आहे.तो ठराव शासनास पाठवत आहे. हे आरोप करणार्‍यांना समजल्याने ते राजकीय श्रेय मिळविण्यासाठी सत्तेत असताना राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे.

उलट त्यांनी राजकारण न करता शासनाने लॉकडाऊनच्या काळातील घऱपट्टी, गाळाभाडे, हॉटेल कर कमी करण्यासाठी सहकार्य करावे. यासाठी ते म्हणतील त्या ठिकाणी आम्ही जाण्यास तयार आहोत. वेळ प्रसंगी वर्षा बंगल्यासमोर देखील आंदोलन करण्याची आमची तयारी असल्याचे नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या