शिंदखेडा तालुक्यात 15 ग्राम पंचायती बिनविरोध

63 ग्रामपंचायतींसाठी 1386 अर्ज ठरलेत वैध
शिंदखेडा तालुक्यात 15 ग्राम पंचायती बिनविरोध

शिंदखेडा - Shindkheda - प्रतिनिधी :

शिंदखेडा तालुक्यात 63 ग्राम पंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.त्यापैकी 15 ग्राम पंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

छाननीच्या दिवशी एकूण 1386 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. आज दि. 4 रोजी माघारीच्या शेवटच्या दिवशी तहसील आवरला यात्रेचे स्वरूप आले होते तर बिनविरोध घोषित झालेल्या ग्राम पंचायत सदस्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.

तालुक्यातील महालपूर ग्राम पंचायत निवडणुकीवरून वातावरण चांगलेच तापले होते. ग्राम पंचायत बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले व त्यात यशही मिळाले.

माघारी नंतर किती उमेदवार निवडणूक रिंगणात असतील या बाबत निवडणूक निर्णय अधिका़र्‍यांकडून अधिकृत आकडा उपलब्ध झाला नाही. उर्वरित ग्राम पंचायत निवडणूक मतदान 15 जानेवारीस होत आहे.

शिंदखेडा तालुक्यातील 15 ग्रा.पं.त बिनविरोध झाल्या आहेत. त्यात टेंमलाय, दसवेल, वडदे, हुंबर्डे- वडली, दिवी, अलाने, हिसपूर, बाभुळादे, धांदरने, कुंभारे प्र.ण., महाळपुर, निशाणे,झोतवाडे, चौगाव बु, म्हळसर यांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com