
नवी दिल्ली | New Delhi
एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) गेल्या आठ महिन्यांपासून ठाकरे गटाला एकामागून एक असे अनेक धक्के दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि चिन्हं याविषयी निर्णय दिल्यानंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हं हे अधिकृतरीत्या शिंदे गटाकडे गेल्याने आता शिंदे गट म्हणजेच मूळ शिवसेना (Shiv Sena) असे म्हटले जाऊ लागल्याने शिंदेंनी शिवसेना पक्षाचे जे-जे आहे, ते सर्व ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वी शिंदेंनी संसदेतील शिवसेना दालनही ताब्यात घेतले होते. मात्र त्यांनी आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. संसदेतील शिवसेनेच्या दालनातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे फोटो काढले आहेत.
संसदेच्या शिवसेना दालनात आता उद्धव ठाकरेंच्या फोटोच्या जागी आनंद दिघेंचा (Anand Dhighe) फोटो लावण्यात आला आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या फोटोच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे.
राज्यातील विधीमंडाळातील (Legislature) शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे आल्यानंतर आता संसेदेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाने ताबा घेतला आहे. यापूर्वी ठाकरे गटाकडून संसदेतल्या ज्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, त्याही रद्दबादल करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, संसदेत (Parliament) आता शिवसेना शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांचा व्हिप चालणार आहे. त्याबरोबरच याआधी मुख्यनेतेपदी संजय राऊत होते, पण यापुढे हे पद गजानन किर्तीकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. शिंदेंनी ठाकरे गटाकडील असणारे सर्व पदं आणि कार्यालये एकामागून एक ताब्यात घेत ठाकरेंना मोठे धक्के दिले आहेत.