Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीसांच्या भूमिकेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले, “काही काळ तुम्ही..."

मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीसांच्या भूमिकेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले, “काही काळ तुम्ही…”

मुंबई | Mumbai

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीत २०१९ साली अजित पवारांबरोबर घेतलेल्या शपथेपासून ते एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दिलेले मुख्यमंत्रीपद तसेच पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीतील युतीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यावर भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे…

- Advertisement -

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र, एकनाथ शिंदे हेच निवडणुकीनंतर युतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील का? याविषयी विचारले असता त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही. तसेच पक्षातील वरिष्ठ हा निर्णय घेतील असे सांगितले. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा सुरु झाली.

२०२४ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री कोण असेल हे दोघांनी मिळून ठरवायचे आहे. याआधी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही युती म्हणून एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाऊ.

निवडणूक झाल्यानंतर काही बदल होणार असतील, तर ते दोघांनी आणि वरीष्ठ नेत्यांनी बसून ठरवले पाहिजे. पण आज तरी जे दोन्ही पक्षांमध्ये ठरले आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी स्वत: जाहीर केले आहे त्यानुसार युती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे. काही काळ तुम्ही राहा, काही काळ आम्ही राहू वगैरे. आमची त्याबद्दलची भूमिका लवचिक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Rain Update : राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; नाशिकला कुठला अलर्ट?

- Advertisment -

ताज्या बातम्या