Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यारोहित पवारांच्या टिकेला शिंदे गटाच्या आमदार संजय शिरसाट यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

रोहित पवारांच्या टिकेला शिंदे गटाच्या आमदार संजय शिरसाट यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई | Mumbai

मागील काही दिवसांत शिंदे गटात (Shinde Group Mla) सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. कोणी मंत्री पदावरून,कोणी पालकमंत्री पदावरून, तर कोणी विकास निधी मिळत नसल्याच्या कारणांवरून नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटाचे काही आमदार पुन्हा ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या टिकेला शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट (Shinde Group Mla Sanjay Shirsat) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

रोहित पवारांच्या (NCP Mla Rohit Pawar) या टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिले आहे. “रोहित पवारही उद्धव गटाचे प्रवक्ते झाले म्हणजे आश्चर्य आहे. संजय राऊत (Sanjay Raut) होते प्रवक्ते, आता हे कशाला होतायत? रोहितजी आपला पक्ष बरा, आपल्याला काय करायचे दुसऱ्या पक्षात काय चाललेय ते”, अशी सूचना वजा टीका त्यांनी केली.

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार; शिमल्यात भूस्खलन, ३० ते ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले

काय म्हणाले होते रोहित पवार

सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गटातील काही आमदार नाराज आहे. तर, शिंदे गटाचे १० आणि इतर ५ असे एकूण १५ आमदार नाराज आहेत. तर नाराज असलेले हे सर्व आमदार ठाकरेंकडे जाण्यास इच्छुक आहेत. पण त्यांना पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत घ्यायचे की नाही, हा निर्णय तेच घेतील, असे आमदार रोहित पवार म्हणाले आहे.

अजित पवार यांच्या भेटीवर शरद पवार पुन्हा बोलले; म्हणाले…

सध्या राज्यात जे सरकार आहे, ते पक्षांमध्ये गट-तट पाडून निर्माण झाले आहे. त्यामुळे या सरकारला लोकांमधील नाराजीचा विचार करायला वेळ नाही. कारण त्यांच्याच गटातीलच अनेक आमदार नाराज आहेत. शिंदे गटात सर्वकाही आलबेल आहे, असे नाही. शिंदे गटाचे जवळपास दहा आमदार नाराज आहेत. याबाबत माझ्याकडे माहिती आहे. शिंदे गटासह इतर असे एकूण पंधरा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्यास उत्सुक आहेत. तर, राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे शरद पवार यांच्याकडेच राहील, असा आम्हाला विश्वास आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या