Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याJayant Patil : 'जयंत पाटील भाजपच्या वाटेवर'; शिंदेंच्या शिवसेनेतील 'या' नेत्याचा मोठा...

Jayant Patil : ‘जयंत पाटील भाजपच्या वाटेवर’; शिंदेंच्या शिवसेनेतील ‘या’ नेत्याचा मोठा दावा

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीला आज (२० जून) एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने शिवसेनेकडून (Shivsena) (शिंदे गट) ‘स्वाभिमान दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला हा दिवस ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, यासाठी पत्र लिहिले आहे.

- Advertisement -

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही (NCP) आज राज्यात ‘गद्दार दिन’ साजरा केला जात आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याचा दावा शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsath) यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Ayodhya Ram Mandir : ठरलं! ‘या’ दिवशी होणार प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसला आमचा का पुळका आला, हे मला कळायला मार्ग नाही. जयंत पाटील भाजपच्या (BJP)वाटेवर आहेत. ज्या पक्षाची स्थापना मुळात गद्दारीतून झाली, ते आम्हाला गद्दारीची भाषा शिकवत आहेत. हे सर्व हास्यास्पद असून याची चिंता आम्ही करत नाही.” असे शिरसाट यांनी म्हटले.

Nashik Accident News : कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, थरारक Video आला समोर

पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) यांनी ज्या दिवशी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा, जयंत पाटील केवळ नाटक करत होते. शरद पवारांनी राजीनामा (Resignation) देणार असे जाहीर करताच जयंत पाटील प्रचंड भाऊक झाले होते. ते इतके का रडत होते, तुम्हाला माहीत आहे का? कारण त्यांना माहीती होते उद्या काय घडणार म्हणून ते रडत होते. त्यामुळे काही दिवस वाट पाहा, जयंत पाटलांचे मार्गक्रमण कुठेतरी झाल्याचे दिसेल,” असे संजय शिरसाटांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik Crime News : अंगावरील दागिने लुटून वृद्ध महिलेची निर्घृण हत्या; गुन्हा दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या