Friday, April 26, 2024
Homeराजकीयआदित्य ठाकरेंच्या 'त्या' गौप्यस्फोटावर शिंदे गटाच्या आमदाराचे प्रत्युत्तर; म्हणाले...

आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर शिंदे गटाच्या आमदाराचे प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई | Mumbai

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya thackrey) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या या गौप्यस्फोटानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे…

- Advertisement -

धक्कादायक! भरधाव ट्रकने ८ जणांना चिरडलं

यावेळी शिरसाट म्हणाले की, मला वाटतं आदित्य साहेबांनी जो दावा केला आहे की, शिंदे साहेब मातोश्रीवर यायचे आणि रडायचे, त्यापैकी ‘रडायचे’ हे शब्द त्यांनी चुकीचे वापरले आहेत. कारण आम्ही सर्वच आमदार वारंवार उद्धव साहेबांना भेटायचो. आम्ही सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्याशी देखील बोललो. शिंदेंना म्हणालो, तुम्ही आमचे गटनेते आहात, आम्ही कोणाकडे जायचं. त्यानंतर निश्चितच एकनाथ शिंदे साहेब मातोश्रीवर गेले असतील. असे त्यांनी म्हटले.

सिटीलिंकची बससेवा सकाळपासून ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

पुढे ते म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की, आम्हाला या आघाडीत राहायचं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आम्हाला त्रास देतात, सहकार्य करत नाहीत. निधीबाबत सहकार्य करत नाहीत. ही आमची भूमिका आम्ही उद्धवजींकडे मांडली होती. परंतु आपण आघाडीतून बाहेर पडावं हे सांगण्यासाठी. सर्व आमदारांची तशीच इ्छा होती. आम्ही सर्वांनीच एकनाथ शिंदेंना तसं सांगितलं होतं. त्यानंतर शिंदे साहेबांनी देखील तेच सांगितलं. बाकी रडले वगैरे बोलायची ही त्यांची स्टाईल असावी, असेही संजय शिरसाट म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या