Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटातील ८ मंत्र्यांवर अतिरिक्त खात्यांची जबाबदारी; कोणाकडे कोणतं खातं? जाणून घ्या

शिंदे गटातील ८ मंत्र्यांवर अतिरिक्त खात्यांची जबाबदारी; कोणाकडे कोणतं खातं? जाणून घ्या

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर मंत्र्यांचे खातेवाटपही झाले.

- Advertisement -

मात्र या खातेवाटपात महत्वाची खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवण्यात आले. त्यामुळे अनेक मंत्री अपेक्षित खातं न मिळाल्याने नाराज असल्याचीही चर्चा रंगली होती. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन आपल्याकडील काही अतिरीक्त खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे दिली आहे.

दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विरोधक कोंडी करु शकतात, या पार्श्वभूमिवर ही खाती या मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. दरम्यान, आजपासून सुरू होणारे अधिवेशन वादळी होणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेतील दोन्ही गट आमनेसामने असणार आहेत.

कोणाकडे कोणतं खातं?

उदय सामंत – माहिती आणि तंत्रज्ञान

शंभूराज देसाई – परिवहन

दादा भूसे – पणन

संजय राठोड – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

तानाजी सावंत – मृद व जलसंधारण

अब्दुल सत्तार – आपत्ती व्यवस्थापन

दीपक केसरकर – पर्यावरण व वातावरणीय बदल

संदीपान भुमरे – अल्पसंख्याक व औकाफ

- Advertisment -

ताज्या बातम्या