Monday, April 29, 2024
Homeराजकीयदिपोत्सवानिमित्त शिंदे, फडणवीस, राज ठाकरे एकत्र

दिपोत्सवानिमित्त शिंदे, फडणवीस, राज ठाकरे एकत्र

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दीपोत्सव ( Dipotsava by MNS ) गेल्या दहा वर्षापासून साजरा करण्यात येतो. इतकी वर्षे मनात असूनही या दीपोत्सवाला हजर राहता आले नाही. मात्र काही गोष्टींना योगायोग लागतो. तो योग आज आला आहे, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केल्या.

- Advertisement -

दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरील मनसेच्या दीपोत्सवाला एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिघेही उपस्थित होते. यानिमित्ताने आगामी काळात शिवसेनेतील शिंदे गट, भाजप आणि मनसे यांची महायुती होऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे.

गेल्या काही दिवसापासून भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे यांची जवळील खूप वाढली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या दोघांनीही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. राज ठाकरे यांनीही या दोघांची भेट घेतली होती. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार देऊ नये, अशी विनंती करणारे पत्र राज ठाकरे यांनी फडणवीस यांना लिहिले होते. राज ठाकरे यांच्या आवाहना नंतर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला होता. या पार्श्वभूमीवर दीपावलीच्या निमित्ताने एकाच मंचावर येणे महत्त्वाचे मानले जात आहे.

मनसेचा दीपोत्सव गेल्या दहा वर्षांपासून साजरा होतो आहे. त्यावेळी मनात असूनही त्याला कधी उपस्थित राहता आले नाही, अशी खंत व्यक्त करून शिंदे म्हणाले, आता तो योग आला आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सण साजरे करता आले नाही. निर्बंध होते. सगळे दबून गेले होते. मात्र आता वातावरण चांगले झाले आहे. सरकारने सगळे सण उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव, नवरात्र आपण उत्साहात साजरे केले. आता दिवाळी देखील उत्साहात साजरी करणार आहोत.

मी आणि उपमुख्यमंत्री आम्ही दोघेही खूप उशीरापर्यंत काम करत असतो. त्यामुळे राज ठाकरे जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर आम्हाला रात्री कधीही भेटू शकतात. आता देखील त्यांनी शेतकऱ्यांबद्दल विनंती केली आहे. आमचे सरकार सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे सरकार आहे. शेतकऱ्यांना निकषांपेक्षा जास्त, कधी कधी तर निकषात बसत नसलेल्या शेतकऱ्यांनाही राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या