Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याभाजप आमदाराची मागणी अन् शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?

भाजप आमदाराची मागणी अन् शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?

संभाजीनगर | Sambhajinagar

गेल्या काही दिवसांपासून आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) हे शिक्षक आणि काही शिक्षक संघटनांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांच्या विरोधात भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत मुद्दा मांडला होता. यानंतर आमदार प्रशांत बंब यांनी विधान भवनात बोलताना शिक्षकांबद्दल अपशब्द वापरल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले…

- Advertisement -

प्रशांत बंब यांच्या मागणीनंतर प्रत्यक्षात प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झाली होती. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पगारातून मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडा भत्ता कपात करण्यात आला होता. यानंतर शिक्षक आणि शिक्षक संघटनादेखील राज्य सरकार आणि शिक्षण विभागाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. शिक्षकांनी याप्रकरणी आता थेट कोर्टात धाव घेतली आहे.

शिक्षकांनी मुख्यालयी राहावे या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आला आहे. काही शिक्षक आणि त्यांच्या संघटनानी याबाबत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार आता राज्य सरकार आणि शिक्षण विभागाला कोर्टाने नोटीस बजावली आहे.

Russia Ukraine War : मिळेल त्या मार्गाने युक्रेन सोडा; भारतीयांना इशारा

शिक्षक मुख्यालयी राहत नसेल तर त्यांच्या पगारातुन घर भाडे भत्ता कपात करावा अशा पद्धतीचे आदेश संभाजीनगर जिल्हा परिषदेने दिले आहेत. संभाजी नगरसह या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात अनेक ठिकाणी सुरू आहे.

कॉलेजमधील प्रेम प्रकरण, बंगळूरूमध्ये लग्नगाठ; ब्रिटनचे PM ऋषी सुनक यांची फिल्मी लव्हस्टोरी वाचाच

भाजपचे (BJP) आमदार प्रशांत बंब (prashant bamb) यांनी शिक्षकांविरोधात (Teacher) उठवलेल्या आवाजामुळे राज्य सरकार अडचणीत आल्याचे दिसून येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या