
मुंबई | Mumbai
मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते.
या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.या व्हायरल अश्लील व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रात्रभर गोंधळ घातला.
पोलिसांनी या प्रकरणी याप्रकरणी आरोपींवर विनयभंगासारखा गुन्हा दाखल करून असे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना अद्दल घडवावी, अशी मागणी करत शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत एकाला अटक केली आहे. पोलिस इतरांचाही शोध घेत आहेत.
या प्रकरणावर शीतल म्हात्रे यांनी एका व्हिडीओतून स्वतःची भूमिका मांडली. शीतल म्हात्रे म्हणाल्या, आज मी कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे. विरोधकांच्या घरीही महिला आहेत. अशा वेळी इतक्या खालच्या थराला जाऊन खोटे व्हिडीओ टाकणे, अश्लील संदेश टाकणे हा प्रकार अत्यंत वाईट आहे.
विरोधक एखाद्या महिलेच्या संदर्भात इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात, हे दिसून येतंय. हा व्हिडीओ युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली आहे.
राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले, तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?, असा सवाल शीतल म्हात्रे यांनी यानिमित्ताने ठाकरे गटाला केला आहे.