शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार?

महाराष्ट्रातून 'या' नेत्याचं नाव चर्चेत
शशी थरूर
शशी थरूर

दिल्ली | Delhi

काँग्रेसनं नवा अध्यक्ष निवडण्यासंबंधी (Congress president polls) विस्तृत कार्यक्रमाची रविवारी घोषणा केली. त्यानुसार २४ सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तर, एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता पडताळून पाहत आहेत. मात्र, याबाबत त्यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. लवकरच ते याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनात्मक सुधारणांची मागणी करणाऱ्या २३ नेत्यांत शशी थरूर यांचाही समावेश होता.

तसेच काँग्रेस अध्यक्षपदाठी इतकरही काही नावं चर्चेत आहेत. शशी थरूर यांच्यासह मनीष तिवारी (Manish Tiwari) आणि पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचीही नावं चर्चेत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात हे दोन बडे नेतेही उतरण्याची शक्यता आहे.

कोण आहे शशी थरूर?

शशी थरूर हे केरळमधील तिरूवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. संयुक्त राष्ठ्रांमध्ये कोफी अन्नान सरचिटणीस असताना जून २००२ ते फेब्रुवारी २००७ याकाळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांचे उपसरचिटणीस-संपर्क आणि सार्वजनिक माहिती या पदावर कार्य केले आहे. २००६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत ते भारताचे अधिकृत उमेदवार होते, त्या निवडणुकीत ते क्रमांक दोनवर राहिले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com