Friday, April 26, 2024
Homeराजकीयबिहारच्या निवडणुकीतून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार - शरद पवार

बिहारच्या निवडणुकीतून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार – शरद पवार

पुणे |प्रतिनिधी|Pune

बिहार मध्ये बदल होईल असे वाटलं होतं मात्र, तेजस्वीने चांगली लढत दिली, बिहार मध्ये आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही.

- Advertisement -

त्याठिकाणी तेजस्वी यादवला फ्री हॅन्ड द्यायचा होता असे सांगत या निवडणुकीतून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

पुण्यातल्या अमनोरा टाऊनशीप मध्ये छात्रभूज नारसी शाळेचा भूमिपूजन कार्यक्रम शरद पवार यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार यांनी बिहार निवडणूक, अर्णब अन्वय नाईक प्रकरण, अमेरिका निवडणुकीवर यावेळी भाष्य केले.

भाजपला बिहार मध्ये ज्यास्त जागा मिळतायत, नितीश कुमार यांचे नुकसान होईल असे वाटले होते. मात्र, तसे झालेले नाही असे ही पवार म्हणाले. अन्वय नाईक यांच्या कुटूंबीय बरोबरचा फोटो पाच वर्षपूर्वीचा असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. तर राज्यपालानी अर्णब गोस्वामीबाबत चिंता व्यक्त केली ही चांगली गोष्ट परंतु ज्या घरात दोन आत्महत्या झाल्या त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असत असा टोमणा पवारांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहार मध्ये चमत्कार झाला हा प्रकाश पत्रकारामुळेच आमच्या डोक्यात पडला अशी टिप्पणीही त्यांनी केली.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना पवार म्हणाले, अमेरिकीचा निकाल स्वच्छ आहे तरीही ट्रम्प मीच विजयी झालो असे म्हणत असतील तर ते त्यांच्या वयाला साजेशे नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या