शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना हेच समीकरण; शरद पवारांची प्रतिक्रिया

शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना हेच समीकरण; शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर फूट पडली असून ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटात राज्यावर सत्तेत आले. तसेच शिंदे गटाने मूळ शिवसेना पक्षावर दावा केला आहे.

यानंतर आता शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावाही आपल्या पद्धतीने घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेली अनेक वर्षे शिवसेनेचा शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा पार पडतो. मात्र यावेळी तिथे उद्धव ठाकरे यांचा मेळावा होणार की शिंदे गटाचा, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना हेच समीकरण असल्याचं सांगत शरद पवारांनी शिवसेनेची पाठराखण केली आहे. 'बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कार्यरत आहे. दसरा मेळावा घेण्याची त्यांची परंपरा आहे, ती लक्षात घेता त्यांनी केलेली मागणी गैर नाही,' असं शरद पवार म्हणाले आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं, 'एकनाथ शिंदेंना दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे, तेदेखील घेऊ शकतात. त्याच्यासाठी त्यांनी बीकेसीचं मैदान मागितलं आणि त्यांना ते मिळालं आहे. त्यामुळे दुसऱ्यांना विरोध करण्याचं काही कारण नाही. शिवसेनेलाही परवानगी देणं आवश्यक आहे'.

तसंच, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या वाढदिवसाला चित्ते आणले आहेत. यावरून पवार यांनी टोला लगावला आहे. 'जुन्नर मधील शेतकऱ्याने पंतप्रधान यांना पत्र लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या शेतमालाला भाव नाही. अशी खंत व्यक्त करत आत्महत्या केली. ज्यांच्या राज्यात शेतकरी आत्महत्या करत असेल तर त्या राज्यकर्त्यांनी काय वाढदिवस साजरे करायचे कशाचे कर्तुत्व यांचे असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com