Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआमदारांच्या घरांना शरद पवारांचा विरोध; म्हणाले...

आमदारांच्या घरांना शरद पवारांचा विरोध; म्हणाले…

मुंबई | Mumbai

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आमदारांना फुकट घरे देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच केली होती. त्यांच्या या निर्णयाला जोरदार विरोध सुरु आहे. या मुद्यावरून मुख्यमंत्री ठाकरेंना सोशल मिडीयावर (Social Media) ट्रोलही करण्यात आले आहे…

- Advertisement -

ही घरे (Houses) आमदारांना म्हाडाच्या (MHADA) गृहनिर्माण योजनेतून देण्यात येणार होती. मात्र विरोध होताच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ही घरे फुकटात देणार नसल्याचे स्पष्ट केले.

Visual Story : …म्हणूनच ‘बच्चन पांडे’ फ्लॉप; अक्षय कुमारची पहिली प्रतिक्रिया

आता या मुद्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या निर्णयाचा विरोध केलेला आहे.

शरद पवार म्हणाले की, आमदारांसाठी गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये कोटा ठेवावा, हे योग्य आहे. मात्र त्या घरांची योग्य किंमत घेऊनच घरे दिली पाहिजे. याबाबत पक्षातील मंत्र्यांशी मी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या