
मुंबई | Mumbai
गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून भाजप १५८ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे...
शरद पवार म्हणाले की, गुजरातमध्ये भाजप सरकारच येणार आहे, यात कोणाचे दुमत नाही. कारण देशातील सगळी सत्ता निवडणूकीत वापरली होती, केंद्राने गुजरातच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेतले.
अनेक महत्त्वाचे प्रकल्प गुजरातमध्ये दाखल केले, त्यामुळे त्याचा परिणाम निकालावर दिसला. गुजरात निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला म्हणजे देशातील लोकमत एकाच्या बाजूने नाही.
कारण दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत जनतेने हे दाखवून दिले. 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपची सत्ता उधळून लावली. त्याच बरोबर हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतही हेच चित्र आहे. त्यामुळे हळूहळू बदल व्हायला लागला आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.