शरद पवार ठरणार मविआचे 'संकटमोचक'; थेट एकनाथ शिंदेंचीच पाडणार विकेट?

शरद पवार ठरणार मविआचे 'संकटमोचक'; थेट एकनाथ शिंदेंचीच पाडणार विकेट?
शरद पवार

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) वाचवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक प्लान तयार केला आहे. विधानससभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना त्यांनी काही विशेष सूचना केल्याची माहिती मिळत आहे...

यानुसार थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच क्लीन बोल्ड करण्याचा पवारांचा प्लॅन असल्याचे समजते. शिवसेनेतील शिंदे समर्थक आमदार हे सध्या गुवाहाटीत आहेत. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईमध्ये विधानसभेतच (State Assembly) यावे लागणार आहे.

शरद पवार
आणखी एक ट्विस्ट; आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळच 'नॉट रिचेबल'

मात्र यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना रोखण्याचा प्लॅन पवारांनी बनवल्याचे समजते आहे. विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांचे सभासदत्व रद्द झाल्यावर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी संख्याबळाचे गणित बदलणार आहे.

शरद पवार
शेतकरी वाऱ्यावर अन् राज्याचे कृषीमंत्री चिंतन शिबिरात; संजय राऊतांची दादा भूसेंवर टीका

याचा फायदा ठाकरे सरकारला (Thackeray Government) करून देण्याची योजना शरद पवारांनी (Sharad Pawar) आखली आहे. एकनाथ शिंदे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाले तर राजकीय चित्र बदलू शकते. यावरच आता मविआ सरकार लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com