राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले...

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले...

मुंबई | Mumbai

अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली होती. या फुटीनंतर अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. या सोबतच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला होता. या दाव्यावर आता निवडणूक आयोग येत्या 6 ऑक्टोबरला सुनावणी घेणार आहे. या सुनावणी आधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं विधान केले आहे. या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राष्ट्रवादी कोणाची याबद्द्ल बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी माझ्यासाठी सामान्य माणसाचा विचार महत्वाचा आहे, असे म्हणत जनतेला खरी परिस्थिती माहीती आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? हे सामान्यांना माहिती आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले. शरद पवार हे आळंदीमध्ये भागवत वारकरी संमेलनात सहभागी झाले. या वेळी त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच दर्शनही घेतले. नियोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील संघर्षाबद्दल हे महत्वाचे विधान केले.

दरम्यान, सध्या शिवरायांच्या वाघनख्यांवरुन नवा वाद सुरू झाला आहे. लंडनमधून आणली जाणारी वाघनखे शिवरायांची नसल्याचा दावा काही इतिहासकारांसह राजकीय नेत्यांनी केला आहे. यावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले. मला याबद्दल काही ज्ञान नाही. मात्र वाघनख्यांबद्दल वाद नको.. असे शरद पवार यावेळी म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com