Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांचा पुणे मेट्रोतून उभ्याने प्रवास

शरद पवारांचा पुणे मेट्रोतून उभ्याने प्रवास

पुणे | Pune

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुणे (Pune) मेट्रोतून (Metro) प्रवास केला. त्यांनी पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला आहे. त्याचे अधिकाऱ्यांना काही सूचनादेखील दिल्या आहेत…

- Advertisement -

शरद पवार (Sharad Pawar) यांचा मेट्रो कामाच्या पाहणी करण्याचा नियोजित दौरा नव्हता. त्यांनी आज सकाळी अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन मेट्रोचे काम किती झाले आहे? कधीपर्यंत काम पूर्ण होणार? कामात अडथळा आहे का? मेट्रोच्या कामाकरिता कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातात आहे अशा विविध गोष्टी पवारांनी जाणून घेतल्या.

पवारांनी फुगेवाडी ते पिंपरीतील संत तुकाराम नगरपर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. यामुळे मेट्रोच्या डब्यामध्ये गर्दी झाली होती. पवारांनी मेट्रोतून उभ्यानेच प्रवास केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या