Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! शरद पवारच राष्ट्रवादीचे 'गॉडफादर'; राजीनाम्याचा निर्णय मागे

मोठी बातमी! शरद पवारच राष्ट्रवादीचे ‘गॉडफादर’; राजीनाम्याचा निर्णय मागे

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. यामुळे अनेक नेते, कार्यकर्ते भावूक झाल्याचे दिसून आले. आज राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर करण्यात आला. तसेच शरद पवार हेच अध्यक्ष राहतील, असा ठरावदेखील मंजूर करण्यात आला.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, २ मे रोजी मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. माझ्या निर्णयानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

IMD : नाशिक, अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा

अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची माझी इच्छा होती. विविध पक्षांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. सर्वांच्या भावनेचा मान राखत मी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेत आहे. आपल्या प्रेम विश्वासाने भारावून गेलो. यापुढे नवे नेतृत्व घडवण्यावर माझा भर आहे. उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Char Dham Yatra : केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला… थरकाप उडवण्याऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेला जयंत पाटील, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, प्रतिभा ताई पवार, रोहित पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र अजित पवार पत्रकार परिषदेला अनुपस्थित होते. शरद पवारांच्या राजीनामा मागे घेण्याच्या घोषणेनंतर वाय बी चव्हाण सेंटरबाहेर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या