शरद पवार प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याच्या तयारीत : आज महत्वाची बैठक

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर उपस्थित राहण्याची शक्यता
शरद पवार प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याच्या तयारीत : आज महत्वाची बैठक
शरद पवार

मुंबई / प्रतिनिधी
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असताना आज, मंगळवारी नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक होत आहे.बैठकीनंतर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असून बैठकीला आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आदी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी बैठकीबाबत माहिती दिली. बैठकीत सर्व निमंत्रित सदस्य आणि कायम निमंत्रित सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन तसेच देशातील राजकीय परिस्थितीवरही बैठकीत चर्चा होणार आहे.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज दिल्लीत शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत प्रशांत किशोर यांनी देशातील सद्य राजकीय परिस्थितीची माहिती पवार यांना दिल्याचे मलिक यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com