शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया; तब्येत स्थिर - नवाब मलिक
शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
शरद पवार

मुंबई / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी दिली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ.बलसरा यांनी पवार यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केल्याचे मलिक यांनी सांगितले.

याआधी शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता १५ दिवसानी त्यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे मलिक म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com