आजचं राजकारण चुकीच्या रस्त्यावर जात आहे - शरद पवार

आजचं राजकारण चुकीच्या रस्त्यावर जात आहे - शरद पवार
शरद पवार

पुणे | Pune

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोपांचे सत्र पाहायला मिळाले. अधिवेशनातील कामकाजाची चर्चा होत असताना पुण्यात एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेतील कामकाजाच्या आठवणींना उजाळा दिला.

महाराष्ट्राच्या विधान सभेत एकेकाळी आम्ही देखील होतो. बापूसाहेब काळदाते म्हणून एक प्रभावी व्यक्तिमत्व होते. ते विरोधी पक्षामधून असायचे. आम्ही लोक सत्तेमध्ये होतो. त्यावेळी आमच्यावर प्रचंड हल्ले व्हायचे,पण त्या हल्ल्यांमध्ये कधी व्यक्तीद्वेषच पाहायला मिळाला नाही. बैठक संपल्यानंतर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बाहेर जात असत. पण आज ती स्थिती राहिली नाही. राजकारण चुकीच्या रस्त्यावर जात आहे की काय याची चिंता माझ्या मनात आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

अलिकडे तुम्ही बघता आणि मी ही बघतो. राज्यातील विधानसभेत सत्ताधारी पक्ष, विरोधीपक्ष यांच्याकडून भाषणे होतात, विरोधकांकडून टीका होते. प्रसंगी टीका करण्याचा अधिकार देखील त्यांचा आहे. पण त्या टीकेमध्ये विद्वेष असला पाहिजे. पण जे आपण अलीकडे पाहिले त्यामध्ये विद्वेष सोडून गेला आहे, असे शरद पवार म्हणाले. हे काही ठीक नसल्याचे सांगत शरद पवारांनी भाजपावर निशाणा साधला.

Related Stories

No stories found.