Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या“तेव्हा फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील, म्हणून…”; शरद पवारांचा खोचक टोला

“तेव्हा फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील, म्हणून…”; शरद पवारांचा खोचक टोला

मुंबई | Mumbai

शिवसेनेतून फुटून भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांवर महाविकास आघाडीकडून गद्दारीचे आणि बेईमानीचे आरोप केले जात आहेत. त्याचा प्रतिवाद करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही तेच केलं होतं, असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar on Devendra Fadnavis) यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं आहे.

- Advertisement -

शरद पवार म्हणाले, मी कधी मुत्सद्देगिरी केली? त्यांनी सांगावं. १९७७ साली आम्ही सरकार बनवलं. पण त्यावेळी भाजपा माझ्यासोबत होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस लहान असतील. त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पुरेसा इतिहास माहिती नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, की मी सगळ्यांना घेऊन सरकार बनवलं होतं. त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते. इतरही काही सदस्य होते. तसेच, मला वाटतं देवेंद्र फडणवीस कदाचित तेव्हा प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना तेव्हाची फारशी माहिती नसेल. ते अज्ञानापोटी असं वक्तव्य करत आहेत. यापेक्षा काही फारसं भाष्य करण्याची गरज नाही, असा टोलाही शरद पवारांनी लगावला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसींना नेतेपदी स्थान दिले जात नाही, असाही आरोप केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, अशी टीका करून ते आपले अज्ञान पुन्हा समोर आणत आहे. छगन भुजबळ, मधूकर पिचड, सुनील तटकरे आदी ओबीसी नेत्यांनी राज्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व केले आहे. ते प्रदेशाध्यक्षपदी राहीले आहेत. आमच्यावर अशी टीका करणाऱ्यांचे वाचन किती आहे, हे मला माहिती नाही. मात्र, ते कोणतीही नोंद न घेताच विधाने करतात. हे आता लोकांनाही माहित झाले आहे. फडणवीसांनी जो प्रश्न उपस्थित केला तो वास्तविकतेला धरून नाही.

लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO

तसेच, पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली आहे. विरोधकांना एकत्र बैठक घेण्याची गरज का पडली, असा सवाल बावनकुळेंनी केला. त्यावर शरद पवार म्हणाले, अशा प्रकारचे भाष्य करणे हे पोरकटपणाचे आहे. आमच्या बैठकीत पंतप्रधान पदावर कोणतीही चर्चा झाली नाही. महाीगाई, बेकायदेशी कारवाया यांना विरोध करण्यासाठी आणि जाती-धर्मांवरुन निर्माण करण्यात येणाऱ्या तणावाला रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. पाटण्यात बैठक होताच मुंबईत भाजपने मित्रपक्षांची बैठक घेतली. म्हणजे तुम्ही बैठक घेतली तर चालते आणि इतरांनी बैठक घेतली तर टीका करायची हे परिपक्व राजकारण नाही.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना लक्ष्य करताना १९७७ साली त्यांनी स्थापन केलेल्या सरकारचा संदर्भ दिला. १९७८ मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षं चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षं चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला होता.

Video : पुन्हा एकदा रेल्वे अपघात! एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला धडक, १२ डब्बे रुळावरून घसरले

- Advertisment -

ताज्या बातम्या