Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार राजकारणातील बरमुडा ट्रँगल, त्यांच्याजवळ गेलेले संपले; विजय शिवतारेंची टीका

शरद पवार राजकारणातील बरमुडा ट्रँगल, त्यांच्याजवळ गेलेले संपले; विजय शिवतारेंची टीका

मुंबई | Mumbai

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी यावर प्रतिक्रिया देत शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

”शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle) असून त्यांच्याजवळ जाणारा संपला आहे. हवंतर त्यांचा राजकीय इतिहास तपासा, अशी टीका शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे. शिवसेना संपवायला शरद पवार जबाबदार असून त्यांना यातून स्वत: चा फायदा करून घ्यायचा होता. निवडणूक आयोगाचा निर्णय पवार साहेबांना अपेक्षित होता. म्हणूनच त्यांनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते, जो निर्णय येईल त्याचं स्वागत केलं पाहिजे. हे मोठे लोक कुठे काही गेम करतील सांगता येत नाही,” अशी टीका शिवतारे यांनी केली आहे.

”२०१४ ला शरद पवारांनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. तो कट होता. पवार साहेबांना शिवसेना-भाजपचा संसार चालू द्यायचा नव्हता. शरद पवारांनी कधीच शिवसेनेशी मिळवून घेतलं नाही. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पवारांचे मैत्रीपूर्ण संबंध असले तरी राजकीय मतभेद होतेच. २०१९ मध्ये एकही उमेदवार नसताना राज ठाकरे यांना पुढे करत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणायला लावला. त्यानंतर राज ठाकरे यांची गरज संपल्यावर त्यांना दूर झटकले” असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या