Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याSharad Pawar : नव्या संसद भवनाबाबत शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले...

Sharad Pawar : नव्या संसद भवनाबाबत शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेलं नवं संसद भवन (New Parliament) हे आता पूर्णपणे तयार झालं असून उद्या (28 मे) त्याचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मात्र, असं असताना देशभरातील अनेक विरोधी पक्षांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील आज मोठं विधान केलं आहे.

- Advertisement -

शरद पवार म्हणाले, साधी गोष्ट अशी आहे की, मी अनेक वर्षांपासून राज्यसभेचा सदस्य आहे, आम्ही ज्या संसद भवनात बसतो तिथे नवी वास्तू बांधायची हे वृत्तपत्रात वाचलं. असा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर संसदेतील सदस्यांशी चर्चा करायची आणि त्यांना विश्वासात घेण्याची आवश्यकता होती. भूमिपूजन केलं, त्यासाठी विश्वासात घेतलं नाही. आता तयार झाली तर उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होत असते, ही पद्धत आहे. पण त्यांनी तेही केलं नाही. ज्या प्रकारे कार्यक्रम चालला आहे, त्याची चर्चाही कधीच केली नाही. त्यामुळे कुणाला विश्वासात न घेता निर्णय घेतला आहे. आता विरोधी पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आपली भूमिका घेतली आहे, त्याला माझा पाठिंबा आहे.

New Parliament House : नव्या संसद भवनाचा आतला व्हिडीओ आला समोर… पाहा त्याची भव्यता

शरद पवार यांनी या समान नागरी संहितेवरही भाष्य केलं. प्रधानमंत्री कायदा चार राज्यात लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, आसाममध्ये लागू करण्याच्या हालचाली आहेत. त्या बातमीत तथ्य आहे, असे माझी माहिती नाही. मी चौकसी केली. त्या राज्यातल्या माझ्या सहकाऱ्यांनी सांगितले की, अशी चर्चा आहे, पण निर्णय नाही. राजकारणात चर्चा होत असतात. असं पवार म्हणाले.

दरम्यान देशातील २१ विरोधी पक्षांनी संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या पक्षांमध्ये काँग्रेस, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम), आप, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, रालोद, टीएमसी, जेडीयू, एनसीपी, सीपीआय (M), RJD, AIMIM, AIUDF (ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट), इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (MDMK) यांचा समावेश आहे.

Rain Alert : ‘या’ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

तर भाजप, शिवसेना (शिंदे गट), नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी, अपना दल – सोनीलाल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, तमिळ मनिला काँग्रेस, एआयएडीएमके, एजेएसयू (झारखंड), मिझो नॅशनल आघाडी, YSRCP, TDP, BJD, BSP, JDS, शिरोमणी अकाली दल या पक्षांनी उदघाटन सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या