Sunday, April 28, 2024
Homeराजकीयशरद पवारांनी घेतली संजय राऊतांची भेट; राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

शरद पवारांनी घेतली संजय राऊतांची भेट; राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

मुंबई | Mumbai

केंद्रीय मंत्री अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची भेट घेऊन त्यांना राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यास सांगितलं आहे. महाराष्ट्रातही सरकार पाडण्याची चर्चा आहे,

- Advertisement -

असे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतांना अशोक गहलोत म्हणाले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज शिवसेना नेते संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. संजय राऊत आणि शरद पवारांच्या या अचानक भेटीमुळं राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शनिवारी (५ डिसेंबर) संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी भांडुप येथील संजय राऊतांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतरही दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची चौकशी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केल्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि धनंजय मुंडे हे तिघे संजय राऊत यांच्या घरी गेल्याची माहिती देण्यात आली.

संजय राऊत यांच्यावर बुधवारी लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पूर्ण झाली. या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी राऊत यांना काही काळ आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ‘खाण्यापिण्यासोबत काही राजकीय पथ्यही डॉक्टरांनी पाळायला सांगितली आहेत. पुढचे काही दिवस कमी बोला. फार कामाचा ताण घेऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सोमवारपासून ‘सामना’त कार्यालयात रुजू होईन, असं राऊत म्हणाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या