मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- शरद पवार भेटीत काय झाली चर्चा? जाणून घ्या...
शरद पवार-उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- शरद पवार भेटीत काय झाली चर्चा? जाणून घ्या...

मुंबई / प्रतिनिधी
राष्ट्रवादी (ncp)काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात गुरुवारी सुमारे तासभर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या 'वर्षा'वर ही भेट पार पडली.


राज्यातील कोरोना तसेच पूरपरिस्थिती, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा(MLA) मुद्दा, ओबीसी(obc) समाजाचे राजकीय आरक्षण, महाविकास आघाडीतील (MVA)नेत्यांच्या मागे लागलेले ईडीचे शुक्लकाष्ठ, महाविकास आघाडीतील समन्वय आदी मुद्द्यांवर दोघांत चर्चा झाल्याचे समजते.

विधानपरिषदेवर नियुक्त करण्यात यावयाच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा विषय अजून प्रलंबित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी १ सप्टेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेउन या प्रश्नी चर्चा केली होती. तसेच राज्यातील पूरस्थिती, गणेशोत्सवाच्या तोंडावर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती, ओबीसी राजकीय आरक्षण तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे लागलेला केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा आदी विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

महाविकास आघाडीतील समन्वयाचा मुद्दाही दोघांच्या चर्चेत होता. शरद पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिका-यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला होता. या अनुषंगाने सरकार आणि पक्ष समन्वयाबद्दलही दोघांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, पवार यांनी यावेळी रयत शिक्षण संस्थेच्यावतीने २ कोटी ३६ लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com