Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस

शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस

मुंबई –

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्तीकर विभागाने नोटीस पाठवली आहे. त्यांना निवडणूक पत्राबाबत

- Advertisement -

स्पष्टीकरण मागितले आहे. शरद पवार यांनीच पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत माहिती दिली. देशातील इतक्या सदस्यांपैकी आमच्याबद्दल प्रेमाची भावना जी दिसत आहे त्याबद्दल आनंद आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

ते म्हणाले, नोटीस आधी मला आली, आता सुप्रियाला येणार आहे असं कळलं, चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशातील इतक्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे. मला काल नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली. त्याचं उत्तर लवकरच मी देईन.

- Advertisment -

ताज्या बातम्या