Barsu Refinery Protest : ''हा सर्वे थांबवा, नाहीतर..."; बारसू रिफायनरीबाबत शरद पवारांची उदय सामंतांशी चर्चा
मुंबई | Mumbai
कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या (Barsu Refinery Project) सर्वेक्षणावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले असून आज आंदोलनाच दुसरा दिवस आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आंदोलक अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत...
याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी सर्वे थांबवण्याबाबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
या चर्चेत शरद पवार यांनी "हा सर्वे थांबवा, लोकांशी आपण चर्चा करुया, एकत्र बसून विश्वासात घेऊन केले पाहिजे नाहीतर, प्रोजेक्ट अडचणीत येईल", अशी भूमिका मांडली आहे. या आंदोलनात ज्यांना अटक केली त्यांना सोडून द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
या चर्चेनंतर उदय सामंत यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना कळवतो, असे आश्वासन दिले आहे. उदय सामंत आणि शरद पवार यांची उद्या सिल्वर ओकवर भेट होणार असल्याचेही समजते.