शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

शरद पवार
शरद पवार

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज मुंबईतील (Mumbai) ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून (Breach Candy Hospital) डिस्चार्ज मिळाला आहे. सोमवारी सकाळी १०:३० वाजता शरद पवार रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली.

शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्याने ३१ ऑक्टोंबर रोजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवस उपचारानंतर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार होता. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रुग्णालयातील मुक्काम वाढला होते. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com